दूषित बुद्धीचा परिणामही दूषित

Share on WhatsApp
करटकशास्त्री सर्पदंश उतरविणारे एक मांत्रिक होते. दमनकशास्त्री अर्धांगवायू बरा करणारे एक थोर वैद्य होते. परंतु दोघेही संकुचित बुद्धीचे होते. आपापल्या विद्येत निष्णात असल्या कारणाने त्यांना अपार धनवैभव प्राप्त झाले व त्यांनी ते सर्व कोठेतरी गुप्त स्थानी पुरून ठेवले. त्यांनी आपली विद्यासुद्धा तितकीच गुप्त ठेवली. वृद्धापकाळीसुद्धा कोणाला शिकविली नाही. त्यांच्याकडे कित्येक तरुण मंडळी त्यांचे शिष्यत्व करावे म्हणून आली, परंतु त्यांनी कोणालाही आपली विद्या शिकविली नाही. मृत्युसमयी फक्त आपल्या मुलांना शिकवायची असे मनाशी ठरविले, कारण त्यांना त्यांच्या व्यवसायात बराच फायदा होत असे.

एके दिवशी पहाटे दमनकशास्त्रींना सांप चावला आणि घरी आल्यावर त्यांनी मुलाला सांप चावल्याचे सांगितले आणि लगेच बेशुद्ध होऊन ओकू लागले. कुटुंबाशी व मुलाशी काही बोलायलाही फुरसत मिळाली नाही.

त्यांचा मुलगा करटकशास्त्रींकडे गेला. त्याने सापाचा मंत्र टाकून वडिलांना वाचवायला सांगितले. परंतु दुर्दैवाने त्याच वेळी करटकशास्त्रींना अर्धांगाचा झटका लागला व त्यांचे हातपाय व तोंड लुळे झाले.
Share on WhatsApp आणखी कथा वाचा