अकलेचा कांदा

Share on WhatsApp
एका गावी एक कमी समजूत असलेला मनुष्य होता. त्याला सर्व 'अकलेचा कांदा' म्हणून हाक मारीत. त्याला वाटे, आपल्याला थोडी अक्कल मिळेल का पहावे.

एके दिवशी त्याने एका कोळ्याला विचारले - "काय रे, अक्कल कशी काय मिळेल?"

तो म्हणाला - "तू दररोज माशाचा मेंदू शिजवून खात जा."

तो वेडा एका रुपयाला माशाचे एक डोके याप्रमाणे दररोज विकत घेऊ लागला. कोळी डोक्याशिवायचा मासा एका रुपयाला विकून आणखी एक रुपया मिळवू लागला. असाच एक महिना गेल्यावर तो वेडा कोळ्याला म्हणाला - "काय रे, संबंध मासा एका रुपयाला विकतोस, मग फक्त डोक्याची किंमत तू एक रुपया का घेतोस?"

तो कोळी स्मित करून म्हणाला - "कळलं की नाही, तुला अक्कल आली म्हणून तर तुला ही गोष्ट कळली?" ते ऐकून 'अकलेचा कांदा' मनाचे समाधान झाल्यासारखा निघून गेला.
Share on WhatsApp आणखी कथा वाचा